देव्हारे येथे ‘नवकार स्टील ट्रेडर्स’चा भव्य शुभारंभ!

देव्हारे रोहिदासवाडी येथे बांधकाम साहित्याच्या नवीन दालनाची सुरुवात; अभिजीत देवळेकर यांनी दिल्या शुभेच्छा

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे रोहिदासवाडी येथे जिओ टॉवरजवळ देवासी बंधू यांच्या पुढाकारातून ‘नवकार स्टील ट्रेडर्स’ या नवीन व्यावसायिक दालनाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारचे स्टील आणि बांधकाम साहित्य उपलब्ध होणार असून, परिसरातील नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे.

नवीन व्यवसायाच्या शुभारंभानिमित्त शिक्षणप्रेमी तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी सदिच्छा भेट देऊन देवासी बंधू यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागात बांधकाम साहित्याची उपलब्धता वाढविणाऱ्या अशा व्यावसायिक उपक्रमांमुळे स्थानिक नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा लाभ होतो. ‘नवकार स्टील ट्रेडर्स’च्या माध्यमातून परिसरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास अभिजीत देवळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

या शुभारंभप्रसंगी ‘नवकार स्टील ट्रेडर्सचे ‘मालक महेश देवासी, जितू देवासी, भरत देवासी, फुसाराम मेगवाल, लाभूराम मेगवाल, ज्येष्ठ व्यावसायिक गंगाराम देवळेकर, जयश्री कुळकर्णी -देवळेकर, देव्हारे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार, सचिव विजय जाधव, सुहास काजारे, शशिकांत आग्रे, अमर देवळेकर, श्वेता देवळेकर यांच्यासह परिसरातील व्यापारी, व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते.

‘नवकार स्टील ट्रेडर्स’च्या शुभारंभामुळे देव्हारे परिसरातील व्यावसायिक क्षेत्रात आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली आहे. देवासी बंधू यांच्या या व्यावसायिक उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.