क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे तर सचिवपदी भगवान लोके यांची निवड

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..

कणकवली : क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या मुंबई, परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी स्वप्निल फाटक यांनी चुकीच्या पद्धतीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांनी गंभीर दखल घेत त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. संस्थेच्या आवारात येऊन विश्वस्तांच्या कार्यालयाला व डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या मुख्याद्यापिकेच्या कार्यालयाला कुलूप घालून सीसीटीव्ही यंत्रणेचे नुकसान करत विश्वस्त, सुकाणू समितीचे नामफलक काढून टाकले. त्याऐवजी अध्यक्ष आणि व विश्वस्त म्हणून इतर तीन जणांचे नावे असलेला फलक लावला. याबाबत समाज बांधवांनी तीव्र शब्दांत नाराजी या बैठकीत व्यक्त केली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने जिल्हा कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली आहे.

 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.यावेळी उद्योजक रामदास विखाळे, पत्रकार भगवान लोके, रविंद्र जोगल, आप्पा चव्हाण, गणेश गावकर, हनुमंत वाळके, आतिष जेठे, साईनाथ ओटवकर, स्वप्निल चिंदरकर, चंद्रकांत डामरे, उत्तम लोके, मिलिंद परब, सचिन आचरेकर, विजय चिंदरकर, अनिल नरे, गणेश नेवाळकर, चंदन गावकर ,संजय रावले, अनिल साळगावकर,सचिन लोके, शरद घाटये, आदेश ओटवकर, मिलिंद परब, कमलेश नरे, रवींद्र नरे, संजय विखाळे, अमित तोडणकर, मंगेश धोपटे, भरत चव्हाण, जयराम डामरे, सुनिल हरमलकर, रमेश चिंदरकर, लक्ष्मण मसुरकर, विजय चिंदरकर, प्रणव नरे, विजय हडकर, जयानंद फाटक,सुनील हरमलकर, गुरुदास चिंदरकर आदींसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित राहून आपली मते व सुचना मांडल्या.

 

सभेच्या प्रारंभी भगवान लोके यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र आणून समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजासमोरील प्रश्न जाणून घेणे आणि ते मार्गी लावण्यासाठी आगामी काळातील प्रयत्न आवश्यक आहेत, त्यासाठी समाजाची संघटना मजबुतीने काम करण्याच्यादृष्टीने चर्चा करावी, असे सुचित केले. त्यानुसार चर्चा होऊन संघटनात्मक बांधणी करण्याचे ठरले.

 

 

—-बॉक्स—

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे, सचिव भगवान लोके, उपाध्यक्ष रविंद्र जोगल, आप्पा चव्हाण, गणेश गावकर, सहसचिव हनुमंत वाळके, सदस्य आतिष जेठे, साईनाथ ओटवकर, स्वप्निल चिंदरकर, चंद्रकांत डामरे, उत्तम लोके, मिलिंद परब, सचिन आचरेकर, विजय चिंदरकर, अनिल नरे, गणेश नेवाळकर, चंदन गावकर आदींची कार्यकारिणीत समावेश आहे.