शस्त्रक्रियेशी संबंधित आजारांवर मार्गदर्शनासाठी अपरांत हॉस्पिटलतर्फे १ नोव्हेंबरला विशेष शिबीर

जनरल सर्जरी व एंडोस्कोपीसाठी तज्ज्ञ सल्ला
सर्जन डॉ. सद्गुरू पाटणकर करणार रुग्णांन मार्गदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : शस्त्रक्रियेशी संबंधित विविध आजारांचे वेळीच निदान व्हावे, रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा आणि योग्य उपचारांचे नियोजन करता यावे, या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जनरल सर्जरी आणि एंडोस्कोपीसंदर्भात रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. मूळव्याध (पाइल्स), फिशर, भगंदर (फिस्टुला), अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातील खडे, मूत्रपिंडातील खडे, स्तनातील गाठी, थायरॉईड ग्रंथीचे विकार तसेच त्वचेवरील गाठी अशा विविध आजारांबाबत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पोटदुखी, आम्लपित्त, पोटातील अल्सर आणि अन्ननलिकेशी संबंधित विकारांसाठी एंडोस्कोपीबाबतही सल्ला दिला जाणार आहे.
या शिबिरात एम.बी.बी.एस., एम.एस. (जनरल सर्जरी) दीर्घकालीन अनुभवी सर्जन व एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉ. सद्गुरू पाटणकर रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांच्या आजाराचे स्वरूप समजून घेणे, आवश्यक तपासण्यांबाबत सल्ला देणे आणि पुढील उपचारांची दिशा निश्चित करणे यावर भर दिला जाणार आहे. अनेकदा आजाराची लक्षणे जाणवत असूनही रुग्ण उपचारांकडे दुर्लक्ष करतात किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास विलंब करतात. परिणामी काही आजारांचे गांभीर्य वाढू शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करून घ्यावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
हे शिबीर रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सावित्री एन्क्लेव्ह, भोगाळे, चिपळूण येथे होणार आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी व अधिक माहितीसाठी ८३८०८६०१३६, ७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३, ०२३५५-२५४२५४/२५४३४५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.