लांजा येथील जेसीबी डंपर ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने बोरवाडी येथे वनराई बंधारा

स्थानिक नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांचा पुढाकार

संतोष कोत्रे
लांजा : लांजा येथील जेसीबी डंपर ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रमा अंतर्गत बोरवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
राज्यात दुष्काळ जन्य परस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या सुचनेनुसार पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत तालुका व शहर परिसरात वनराई बंधारे बांधण्यात यावे अशा प्रकारे आवाहन करण्यात आले.
या आवाहनानुसार लांजा नगरपंचायतीच्या
नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये व युवा शहराधिकारी प्रसाद भाईशेट्ये यांच्या पुढाकारातून
बोरवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्या मुळे बोरवाडी डाफळेवाडी गव्हाणे कुक्कुटपालन इत्यादी वाड्याच्या विहिरीना पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या भागात जवळपास तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. या मुळे काही महिने तरी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मदत होणार आहे.तसेच परिसरात विहिरीची पाणीपातळी वाढेण्यास मदत होणार आहे.
बंधारा बांधताना प्रसाद भाईशेट्ये यांच्यासह
जेसीबी डंपर टेम्पो युनियनचे , गणेश लांबोरे, दिनेश वाघाटे, समीर मुजावर,गणेश कोपरे, शांताराम लांबोरे , संजय जाधव,सह सदस्य उपस्थित होते.