चिपळूण (प्रतिनिधी) : एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे चालू असलेल्या “मुंबई विद्यापीठ कोकण विभाग इंटर कॉलेजिएट अॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२६-२७” मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १.५ किलोमीटर धावणे या क्रीडा प्रकारात स्वराज संदीप जोशी याने प्रथम (गोल्ड) क्रमांक पटकावला.
तसेच राज राजेंद्र शिर्के यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ५ किलोमीटर धावणे या प्रकारात स्वराज संदीप जोशी याने प्रथम क्रमांक (गोल्ड) पटकावला. तसेच यश मंगेश शिर्के यांनी द्वितीय क्रमांक (सिल्वर) पटकावला. १० की.मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु. यश मंगेश शिर्के याने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावला आहे. तसेच त्याची इंटर झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या, क्रीडा प्रशिक्षक-मार्गदर्शक, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने यशचे खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.













