राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) : यावर्षीची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता दुष्काळ निवारणासाठी लांजा तालुक्यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे (KT) बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लांजा तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी केली असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. त्यासाठी आपणास आता उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोकणामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडतो तरी सुद्धा काही भागात उन्हाळ्यात पाणी कमी पडते. सध्या एल निनो मुळे मोठे संकट महाराष्ट्र समोर उभे आहे. त्यामुळे आपण कोकणातील पाणी आडवणे गरजेचे आहे.
त्यामुळे आपण लांजा तालुक्यातील खेडेगावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यांच्या शेजारी वाहणारे छोटे पऱ्या, ओढे, नाले किंवा नदी असतील. अशा ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तर मार्च ते मे पर्यंत जी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. त्यावर थोडीफार उपाययोजना होऊ शकते. तरी महाराष्ट्र सरकार म्हणून आपण लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी लागणारे पाणी यावर उपाय होवू शकतो.
तरी लांजा तालुक्यातील सर्व गावांमध्ये कमीतकमी दोन ते तीन बंधारे मंजूर करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे दाजी गडहिरे यांनी केले आहे













