वैभव नाईक यांना जनतेने गंभीरतेने घेतलं नाही म्हणूनच ते आमदारकी गमावून बसले

कुडाळ प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबाबत वैभव नाईक यांनी टीकेचा सूर आळवला होता. खर म्हणजे आमचे नेते निलेश राणे आमदार झाल्यापासून त्यांनी जो कामाचा धडाका लावला आहे, लोकांच्या विश्वासास ते पात्र ठरत आहेत, लोकांना वाटतं की यापूर्वीच निलेश राणे आमदार झाले पाहिजे होते. त्यांच्या या यशामुळेच आज वैभव नाईक यांना जळी स्थळी आमदार निलेश राणे दिसतात. असे टिकास्त्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी सोडले आहे.

होय आम्ही युतीमधूनच आमदारांना विजयी केलं होतं. युती धर्म पाळूनच आमचे नेते निलेश राणे या ठिकाणी काम करतात. परंतु शिवसेनेचे नेते मुख्य नेते महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर जर कोणी टीका केली तर त्या टिकेला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं काम त्यांचे विश्वासू शिलेदार म्हणून निलेश राणे सातत्याने करतात. त्यामुळे निलेश साहेब कोणाच्या जीवावर निवडून आले, ते काय करतात याचा विचार करण्यापेक्षा वैभव नाईक यांनी आपल्या नेत्यांचा अभ्यास करावा. आपणही १९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती म्हणूनच निवडून आला होता. परंतु आपल्या नेत्यांनी युतीधर्म सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केलेली होती. याच आपण कशाप्रकारे समर्थन करता. आपणही त्यावेळी भाजपच्याच पाठिंबावर निवडून आला होता आणि भाजपशीश बेईमानी केली, हे जनता विसरू शकत नाही. जनता एकच लक्षात ठेवत आहे की निलेश राणे आमदार झाल्यापासून कुडाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. सत्ता आपली असून सुद्धा आपल्या या भागाच्या जनतेवर होणाऱ्या अन्याय साठी सरकारच्या विरोधात बोलण्याची धमक सुद्धा विधान परिषदेमध्ये निलेश राणे साहेब दाखवतात. याचाच अर्थ निलेश राणें मध्ये आपल्या भागातील जनतेला न्याय देण्याचं सामर्थ्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या नेत्यावर जर कोण बोलला त्याला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं धाडसही आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी निलेश राणे याचं वक्तव्य गंभीरतेने घेऊन नये हे बोलणं बालिश पणाचे वाटतं. कारण मुळातच या भागाच्या जनतेने दहा वर्षानंतर गंभीरतेने विचार केला आणि निलेश राणे साहेब यांना आमदार केलं. आपला मात्र गंभीरतेने जनतेने विचार केला नाही.त्यामुळे आपण माजी आमदार झाला आहात हे विसरू नये. या भागातील जनतेचा विश्वास निलेश साहेबांच्या कार्य कर्तृत्वावर आहे. त्यांच्या नेतृत्वात मुळे आज शिवसेना पक्ष धडाडीने पुढे जात आहे. आणि त्यामुळे भविष्यात आपल्याला नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा जनता स्वीकारणार नाही हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे असे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी म्हटले आहे.