मसुरे | झुंजार पेडणेकर
मसुरे देऊळवाडा (पन्हाळकर टेंबवाडी) येथील ३६ वर्षीय तरुण प्रसाद प्रकाश परब याला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना घडली असून, या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद प्रकाश परब (वय ३६) हे मसुरे देऊळवाडा येथील रहिवासी आहेत. १८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व परिसरामध्ये चिंतेचे वातावरण असून, मालवण पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
सदर व्यक्तीबाबत कोणालाही काहीही महिती मिळाल्यास किंवा ते आढळल्यास तात्काळ ९४२३३१३४७५ या मोबाईल
क्रमांकांवर तसेच मालवण पोलीस ठाणे किंवा पोलीस दूरक्षेत्र, मसुरे
येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.













