दोडामार्ग l प्रतिनिधी :शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेवर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत असतानाच, आता दुष्काळातही शासनाकडून चुकीचे नियम लावून अनेकांचे रेशनचे धान्य बंद करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अन्यायकारक भूमिकेविरोधात ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत असून, शासनाला जाग आणण्यासाठी आणि हा निर्णय बदलण्यासाठी आवाज उठवण्यात येणार असल्याचा ईशारा शिवसेना तालूका प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना म्हणाले की, शेतकरी यांचे
“वार्षिक उत्पन्नाची केवळ ४५ हजार रुपयांची अट ठेवणे हाच सरळसरळ जनतेवर मोठा अन्याय आहे. दुष्काळात रोजगार नाही, हाताला काम नाही आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत एक कुटुंब वर्षभर कसे जगू शकणार? त्यातच शासनाकडून धान्याचे वाटप बंद केल्याने सामान्य लोकांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे.”
शासन दरबारात आवाज उठवणार असून
ग्रामीण भागातील जनतेवर होत असलेला हा अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. दुष्काळजन्य परिस्थिती पाहता लोकांचे धान्य पूर्ववत तातडीने चालू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा शासनाचा अन्यायकारक निर्णय त्वरित बदलावा, यासाठी गरज पडल्यास शासन दरबारात तीव्र आवाज उठवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.













