फुस लावून पळवून नेल्या पकरणी अज्ञात इसमावर
गुन्हा दाखल
लांजा ( प्रतिनिधी) : तालुक्यातील इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण हा ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे जातो सांगून बाहेर पडल. परंतु तो घरी न परतल्याने अज्ञात इसमाने त्याला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांकडून करण्यात आली असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आइंदवटीला आहे .
बाबतची फिर्याद सुवर्णा सुनील जाधव( वय ६२ राहणार इंदवटी जाधववाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांचा पुतण्या स्वप्नील धनंजय जाधव( वय २३ वर्षे सध्या राहणार घोटवडे फाटा मुळशी पुणे, मूळ इंदवटी जाधववाडी) हा दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास इंदवटी जाधववाडी येथून पुणे येथे जातो असे सांगून निघून गेला होता. मात्र तो घरी न परतल्याने अज्ञात इसमाने त्याची संमती नसताना फूस लावून त्याला पळवून नेल्या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहता ३०२३ चे कलम
१४० (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर हे करत आहेत













