तालुक्याचे सुपुत्र सुभाष लाड ‌ संपादक असलेल्या मोडी दर्पण अंकाचे ४ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

लांजा (प्रतिनिधी) : लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र सुभाष लाड यांच्या मोडी दर्पण या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा उद्या बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दादर मुंबई येथे होणार आहे.
राजश्री शाहू सभागृह, श्री शिवाजी महाराज नाट्य मदिर दादर या ठिकाणी होणाऱ्या या मोडी दर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, कवी ,लेखक, चित्रकार विजयराज बोधनकर, लेखिका चित्राताई वाघ, लेखक तथा नाटककार विजय लाड, यांची उपस्थिती लाभणार आहे.‌ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोडी दर्पण चे संपादक सुभाष लाड हे भूषवणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी शैलेश बापट, इतिहास व मोडी अभ्यासात सुनील कदम, लेखक सुरेश हांडे, उद्योजक तथा नाटककार मंगेश हांदे, मुंबई मनपाचे उपअधीक्षक रमेश काटकर, रत्न सिंधू गोठणे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विक्रोळी चे संस्थापक तातोबा हाटले आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच गमन या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम यांची उपस्थिती लाभणार आहे.‌