जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी दिलेला शब्द पाळला; ऐन दिवाळीत ग्रामस्थांना झगमगित प्रकाशाची भेट
कणकवली : कलमठ येथील बिडयेवाडीमधील गणेश मंदिरासमोर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हायमास्ट दिव्याच्या मागणीला अखेर मूहुर्त स्वरूप आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी दिलेला शब्द पूर्ण करत ऐन दिवाळीत या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारा स्वयंचलित हायमास्ट दिवा उभारला. या हायमास्ट दिव्याचे लोकार्पण पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री, प.स.सदस्य गुरुनाथ वर्देकर, सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच पपू यादव, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, स्वप्नील चिंदरकर, महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य तनिष्का लोकरे, अनुप वारंग, सचिन खोचरे, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, संदीप म्हाडगुत, विकास मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, रुपेश मेस्त्री, रुपेश नाडकर्णी, संतोष मेस्त्री, प्रतीक माईणकर, निनाद नाडकर्णी, यल्लापा मस्तरमाडी, शैलेजा मुखरे, भाग्यलक्ष्मी लोके, अभिजित चव्हाण, समीर रजपूत, प्रणय शिर्के, महेश नाडकर्णी, स्वरूप कोरगावकर, सिद्धेश रजपूत, हनुमंत पांचाळ, गौरेश मेस्त्री, मयूर गावडे, श्रावणी मेस्त्री, रुद्र पाटील, सई पाटील यांच्यासह बिडयेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संदीप मेस्त्री म्हणाले,
कलमठ बिडयेवाडी ग्रामस्थांची गणेश मंदिर परिसरात हायमास्ट दिवा बसविण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी पाठपुरावा केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला. बिडयेवाडी येथील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने स्थानिक समस्या मार्गी लावण्यासाठी काम करत आहोत. येथील ट्रान्सफार्मरचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावला जाईल.
भगवान लोके म्हणाले, कलमठ बिडयेवाडी येथील गणेश मंदिर हे मुख्य ठिकाण आहे. गणपती मंदिरासमोरच स्वयंचित सौर उर्जेवर चालणारा हायमास्ट लावल्यामुळे परिसर प्रकाशमय झाला आहे. खऱ्या अर्थाने या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देणारे पालकमंत्री नितेश राणे व पाठपुरावा केल्याबद्दल जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच पप्पु यादव यांचे आम्ही आभार मानतो. ग्रामस्थांनी देखील पक्षमतभेद बाजुला ठेवून काम करणाऱ्या लोकप्रतिनीधींच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
यावेळी बिडयेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री, प.स.सदस्य गुरुनाथ वर्देकर, सरपंच संदीप मेस्त्री यांचा उपसरपंच पपू यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचे स्वागत केले.
दिवाळीच्या मुहुर्तावर गणेश मंदिर प्रकाशमान झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.













