इतिहास जपणाऱ्या किल्ल्याच्या तीन प्रतिकृतींना रोख रकमेची बक्षिसे
सहभागी सर्व स्पर्धकांच्या सर्व रील्सना प्रसिद्धी
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आ. श्री. निलेश राणे मित्रमंडळ, खा. श्री. नारायणराव राणे संपर्क कार्यालय आणि प्रहार Digital च्या वतीने भव्य रत्नागिरी तालुका स्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील युवक, मंडळे आणि नागरिकांना गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची रचना, त्यांचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सहभागी सर्वच स्पर्धकांच्या किल्ल्यांचे Reels ना प्रहार Digital च्या instagram पेज वर प्रसिद्धी दिली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत reels पाठवणे बंधनकारक असून, पाठवलेल्या Reel पैकी परीक्षकांनी निवडलेल्या १० reels मधील किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील ३ किल्ल्यांची बक्षिसांसाठी निवड करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा केवळ रत्नागिरी तालुक्यापुरती मर्यादित असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिल्या तीन क्रमांकना ₹3333/-, ₹2222/-, ₹1111/- ची बक्षिसे देण्यात येणार आहे
रत्नागिरी तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी, मंडळांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा जपण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. श्री. निलेश राणे मित्रमंडळ, खा. श्री. नारायणराव राणे संपर्क कार्यालय आणि प्रहार Digital वतीने करण्यात आले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : 8888380065 , 7620210466 , 9518588700












