वेंगुर्ले : प्रतिनिधी
मठ गावातील पाणी साठवण बंधाऱ्यांना सहकार्य देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची रोटरी इंटरनॅशनलच्या मासिकात दखल घेण्यात आली आहे. गावातील जलसंधारणाच्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळणे ही मठ गावासाठी अभिमानाची बाब आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील विविध गावांमधील बंधाऱ्यांच्या कामांसाठी (मठ ग्रामपंचायत/आरवली ग्रामपंचायत/ वेंगुर्ला नगरपालिका/सागरतीर्थ ग्रामपंचायत) रोटेरियन दीपक ठाकूर (ठाकूर कॅश्यूज) यांनी वैयक्तिकरित्या एकूण ₹५०,००० ची मदत दिली. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या माध्यमातून ही मदत विविध गावांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यातील मठ गावातील बंधाऱ्यांसाठीची मदत district governor लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते मठ गावच्या सरपंच नाईक मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमाबद्दल district governor लेनी डि कोस्टा यांनी दीपक ठाकूर आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे विशेष कौतुक केले. स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन यासाठी केलेल्या या प्रयत्नाला मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल प्रेरणादायी आहे.
मठ गावातील नागरिक, ग्रामपंचायत तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रोटरी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!











