लांजा तालुका भाजपाच्या ओबीसी तालुकाध्यक्ष पदी ( दक्षिण) मकरंद जोशी यांची निवड

लांजा रेस्ट हाऊस येथे पार पडली बैठक, अन्य पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी जाहीर

संतोष कोत्रे
लांजा:  लांजा तालुका भाजपाच्या ओबीसी तालुकाध्यक्ष पदी ( दक्षिण) खावडी गावचे माजी सरपंच मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपाचे ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सहदेव बेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी लांजा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीमध्ये पक्ष संघटने बाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सहदेव बेटकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर ओबीसी मोर्चा च्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. तसेच त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये ओबीसी तालुकाध्यक्ष पदी ( दक्षिण) खावडी गावचे माजी सरपंच मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी कांटेगाव प्रमुख महेश गोरूले, सरचिटणीस संदेश मांडवकर, कोषाअध्यक्ष चंद्रकांत कोटकर, कार्यकारणी सदस्य म्हणून अभि वाघधरे, अनंत गुरव , स्वप्निल भोवड, तुषार आग्रे, संकेत नामये, श्रीपाद घुमे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सहदेव बेटकर यांच्यासह
उपाध्यक्ष रवींद्र राणे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बब्या हेगिष्टे, ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरूप, अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष अनिल कांबळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष इकबाल गिरकर, लांजा दक्षिण मंडळ अध्यक्ष शैलेश खामकर, उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले, माजी तालुका अध्यक्ष शेखर सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश माजळकर , श्री.निवते, श्री.
मुळे उपस्थित होते.