ग्रुप ग्रामपंचायत देवघर येथे भव्य भजन स्पर्धा संपन्न

खेड (वार्ताहर )दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत देवघर सोंडेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, माझी वसुंधरा अभियान 6.0 प्रभावीपणे राबविण्यासाठी व त्याची प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत भजनी मंडळांची भजन स्पर्धा आयोजित करण्यातआली.

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विठ्ठल रखुमाई भजन मंडळ देवघर मावळवाडी, द्वितीय पारितोषिक जय हनुमान भजन मंडळ देवघर उघडवाडी, तृतीय पारितोषिक रामरदायनी भजन मंडळ सोंडे यांनी पटकावला, उत्कृष्ट गायक कुमार ओकार विलास मोरे जय हनुमान भजन मंडळ देवघर उघडवाडी, उत्कृष्ट पखवाज वादक कुमार सोहम श्रीधर मोरे विठ्ठल रखुमाई भजन मंडळ देवघर मावळवाडी हें ठरले. या भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह.भ.प. श्री जयवंत महाराज निकम गाव किंजळे तर्फे नातू, व ह. भ.प. श्री राजेंद्र महाराज कदम गाव शिंगरी हे होते.

 

या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत देवघर सोंडे चे सरपंच सुनील मोरे माझी उपसभापती श्री रविंद्रजी मोरे, उपसरपंच श्री. नामदेव सोंडकर ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम सदस्य रवींद्र इंगळे, पुष्पाताई मोरे,, कांचन मोरे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुधीर मोरे माजी सरपंच रेश्मा मोरे ह भ प श्री पांडुरंग महाराज जाधव, It’s विलास मोरे, ह भ प. श्र. दत्तराम सोंडकर सोंडे गावचे पोलीस पाटील संजय सोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये गावातील सहा भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.