चिवला बीच समूलबाग परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण!

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून उभारणी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ 

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून चिवला बीच समूलबाग परिसरात उभारणी करण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. परिसरातील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

 

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेविका अश्विनी कांदळगांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर,

नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेवक ललित चव्हाण, उद्योजक मोहन वराडकर, राजन परुळेकर, भाई मांजरेकर, अखिलेश शिंदे, निकीत वराडकर, रुजाय फर्नांडिस, गणेश चिंदरकर, विजय केळूसकर, विनोद शंकरदास, संजय कांदळगावकर, सुधीर कांदळगावकर, उदय परब, विनायक रेडकर, प्रदीप मयेकर, रुपेश कांबळी, हर्षद सावंत, संतोष सावंत, राहुल किर, चंदन मयेकर, संतोष परब, मनोज शिरोडकर, राजा वालावलकर, प्रितम शिंदे, वीज कर्मचारी भालचंद्र वस्त यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.