गुहागर प्रतिनिधी :
तालुक्यातील गिमवी गावातील आदिवासी वाडीत भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
या प्रसंगी आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. तसेच त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद, प्रेम आणि आपुलकी पोहोचविण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ‘पालावरच्या दिवाळी’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर, बूथ प्रमुख महेश जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













