पळसंब वायंगणकरवाडीत बंधारा उभारणी

▪️‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला ग्रामस्थांचा हातभार

मसुरे | झुंजार पेडणेकर 

लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत पळसंब येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारण उपक्रमांतर्गत वायंगणकरवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर परिसरात बंधारा बांधण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक साठा व्हावा, तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात श्रीधर (बाबू) सावंत, वैभव सावंत, दशरथ सावंत, संतोष सावंत, प्रसाद सावंत, वेदांत सावंत, मनीषा सावंत, सोनल सावंत, दुर्वांक सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनसंपत्तीच्या पूजेसोबतच भविष्यातील पाण्याची संपत्ती जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे मत पळसंबचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केले. तसेच या स्तुत्य उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.