जिल्हा परिषद शाळेतील दोन ग्रामीण विद्यार्थिनींची अमेरिकेला झेप; सातासमुद्रापार जाऊन घेणार अंतराळवीर प्रशिक्षण केंद्राचा अनुभव

मंडणगड प्रतिनिधी : काही वेळा माणसाच्या उपलब्धी स्वप्नवत वाटतात… हीच प्रचिती मंडणगड तालुक्यास आली आहे. जिल्हा परिषद प्राथमीक शाळा गोठे व वेसवी येथे शिकणाऱ्या अतिशय ग्रामीण भागातील आणि कष्टकरी सामान्य कुटुंबातील दोन विद्यार्थिनी उद्या अमेरिकेला चालल्या आहेत.
कु. अपेक्षा बोथरे (गोठे) आणि कु. मानस जाधव (वेसवी – बाणकोट) हे दोन विद्यार्थि वयाच्या अवघ्या 14-15 व्या वर्षी सातासमुद्रापार पोहचणार आहेत.
चौदा दिवसांचा अमेरिका दौरा
दि. 12 नोव्हेंबर ते दि. 25 नोव्हेंबर असा 14 दिवसांचा दौरा या मुलींसाठी अभिमान आणि गौरवाची अनुभूती देणारा असणार आहे.

या प्रवासात त्या मुंबई ते दुबई आणि दुबई ते ऑर्लांडो असा विमान प्रवास करून अमेरिकन धरतीवर पाय ठेवणार आहेत. तेथे त्या ऍस्ट्रनॉट ट्रेनिग सेंटर आणि केनडी स्पेस रिर्सच सेंटर ला भेट देणार आहेत.
त्याचबरोबर मियामी, लॉस वेगास, फ्लोरिडा, फेन्सो, लॉस एंजेलिस, सॅनफ्रान्सिस्को इत्यादी प्रमुख शहरांना भेटी देऊन पुन्हा मायभूमीत परतणार आहेत.
या मुलांचा त्यांच्या केवळ आई-वडिलांनाच नाही, तर पुर्ण तालुक्यास गर्व आहे,

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी अमेरिकेत जाऊन अंतराळ संशोधन केंद्र पाहणार, ही घटना संपूर्ण मंडणगड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या दोन्ही विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीस तालुक्यातुन हार्दिक शुभेच्छ देण्यात येत आहेत