खाक्षी तिठा-दाभोळे रस्त्यावर दगडाने भरलेला डंपर पलटी

**खाक्षी तिठा-दाभोळे रस्त्यावर दगडाने भरलेला डंपर पलटी**

**टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले; सुदैवाने जीवितहानी टळली**

**अपघातात चालक सुखरूप; वळणावर डंपर उलटल्याने रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच**

साक्षी तिठा ते दाभोळे या रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास दगडाने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात झाला. रस्त्यावरील एका वळणावर हा डंपर उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. डंपरचालक सुखरूप बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपरमध्ये मोठ्या प्रमाणात दगड भरलेले होते. प्रवासादरम्यान अचानक डंपरचा टायर फुटल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. त्यातच संबंधित रस्त्यावरील वळण आणि रस्त्याची स्थिती लक्षात घेता डंपर सावरणे चालकाला शक्य झाले नसावे. त्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातामुळे डंपरमधील मोठे दगड रस्त्यावर पडले. मात्र, चालक सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.