दिवाळी पाडव्या निमित्त आचरा येथे बैल फेरी

आचरा-अर्जुन बापर्डेकर

दिवाळी पाडव्या निमित्त आचरा येथे राज गृप तर्फे बैलांना सजवून आचरा तिठा ते स्मारक दरम्यान फेरी काढण्यात आली. या फेरीत बैलमालक आबा सावंत ,नितीन घाडी,विनय सावंत, यांच्या सह हर्षद सावंत

सौमित्र राणे ,संदेश मेस्त्री

विक्रांत आचरेकर कार्तिक राणे

मंथन घाडी ,ओमकार घाडी

यश घाडी ,गजेंद्र कामतेकर

चिराग आचरेकर ,पुष्कर राणे

मृणाल लाड ,गणेश देसाई

हर्ष घाडी ,हर्षद लाड

दुर्वांग आचरेकर ,श्रेयस राणे ,विराज राणे ,चैतन्य कांबळी

शिवा देसाई यांसह अन्य आदी। सहभागी झाले होते. गुर म्हणजे शेतकऱ्यांचा आधार होता.

कोकणात दिवाळी पाडव्या निमित्त गुरांना रंगवून,ओवाळले जाते. मात्र सध्या गुरे पाळणे कमी झाल्याने या प्रथा मागे पडू लागल्या. गोठ्यात गुरेच नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरांबाबत शेतकऱ्यांमध्ये पुन्हा ओढ निर्माण व्हावी. गुरे पाळण्याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने आचरा येथे राज गृप तर्फे आबा सावंत यांच्या पुढाकाराने ही बैल फेरी काढण्यात आली.