चिपळूण (प्रतिनिधी) : दरवर्षी चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात सार्वजनिक मौन्जीबंधनाचा उपक्रम संपन्न केला जातो. त्याप्रमाणे गुरुवार दि. ७ मे रोजी ५ बटूंच्या मुंजी संपन्न झाल्या. सुमारे महिन्यापूर्वीच बटूची नोंदणी संघात झालेली होती. त्यावेळी संघाकडून कोणते विधी केले जातात बटूंच्या कुटुंबीयांनी आपल्या घरी कोणते विधी पूर्ण करायचे हे सांगितले जाते.
गुरुवारी सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्याने बटू आणि त्यांचे सर्व कुटुंबीय संघाच्या आवारातील श्रीदेव वीरेश्वर मंदिरात उपस्थित झाले. मंदिरा शेजारील पुजारी निवासात सर्वाना आपापले सामान ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. या मौंजी बंधनाचे पौरोहित्य वे. मु. विठला शास्त्री चितळे यांनी केले. गुरुजी नेहमीच सर्व विधी साहित्यासह येऊन पौरोहित्य करतात. याच्या बदल्यात संघाकडून ते कोणतीही दाक्षिणा घेत नाहीत. त्याप्रमाणे ८ वाजता गुरुजी सर्व साहित्यासह आणि सहकारी वे. मु माधव ओक यांच्या सह उपस्थित झाले. आवश्यक ती मांडामांड झाल्यावर प्रत्यक्ष विधिना सुरुवात झाली. सुमारे ९.१५ वा मध्यंतर झाले. त्यावेळी श्री केटरर्स यांनी सर्वाना अल्पोपाहार आणि चहा दिला. नंतर पुढील विधिना सुरुवात झाली ११ वा गुरुजींच्या सुमधुर आवाजातील मंगलाष्टकांनी मुंजी संपन्न झाल्या.
ब्राह्मण सहय्यक संघाने मुंजीची सर्व तयारी आधीच करून ठेवली होती. याकामी सचिन चितळे, संजय नाचणकर आणि श्री. करंजकर यांनी मोलाचे सहकार्य केले. बटूंच्या कुटुंबीय पैकी सौ. माधुरी जोशी यांनी संचालकांना आवश्यक ती मदत आपणहून केली.बटूसाठी पुष्प हार आणि गुच्छ श्री राजूशेठ कानडे यनी सकाळीच आणून दिले. या विधी साठी बैलाचे शेण आवश्यक असते ही वस्तू सध्या दुर्मिळ आहे. पण श्री बल्लाळ श्रीधर भिडे यांनी आपल्या गोठ्यातून ते आणून दिले. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ब्राह्मण सहाय्यक संघाचे सर्व संचालक आपापल्या वेळेप्रमाणे येऊन सहकार्य करीतच होते. सर्वांचे उत्तम सहकार्य असल्यामुळे एक वार्षिक उपक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला. मुंजी नंतर सर्वाना पक्वन्नांसह भोजनाचेही आयोजन केले होते. श्री केटरर्सचे महेश दातार आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळीनी उत्तम सुग्रास भोजन सर्वाना वाढले. बटू शार्दुल भगत याचे पालक रवींद्र भगत यांनी स्वखुशीने संघाला ५००१ रुपयांची देणगी दिली. सहभागी बटू कार्तिक देवरुखकर, शार्दुल भगत, दिनेश वेस्वीकर, योगेश वेस्वीकर, मिहीर आंबेकर हे पाच बटू होते.
संघाच्या संचालकांपैकी सर्वश्री पोंक्षे, केतकर, विवेक जोशी, आनंद चितळे, डॉ. मेहेंदळे, मिलिंद पिम्पुटकर, सुनील जोशी, विलास चौघुले, आणि सौ, संगिता मुळ्ये, सौ. माधुरी बापट, सौ. भाग्यश्री यमकनमर्डी, सौ. स्वाती कार्ले गोंधळेकर या महिला मंडळाच्या सदस्य पूर्णवेळ उपस्थित होत्या.













