रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील के सी जैन नगर येथील श्री महालक्ष्मी मिनी मॉलला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. मॉलच्या मधल्या भागात आग लागल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन बंबात पाणी नसल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला अशी माहिती पुढे येत आहे. अखेर फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
महालक्ष्मी मिनी मॉल परिसरात के. सी. जैन नगर असून, येथे अनेक कार्यालये आणि दुकाने आहेत. याच मिनी मॉल च्या वरच्या बाजूला दैनिक सागर चे रत्नागिरी कार्यालय सुद्धा आहे. त्यात सध्या वेगवान वारे वाहत असल्याने ही आग अधिक वेगाने पसरत होती. त्यात हा मिनी मॉलमधे मोठ्या प्रमाणात सामान असून त्याला अंतर्गत छोट्या छोट्या केबिन्स, पोट माळे आहेत.
त्यामुळे या आगीमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.












