श्रीं रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे चे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार.सुनील जाधव आसावरी कदम यांचाही या पुरस्काराने होणार सन्मान.

 

ओटवणे (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे चे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांना जाहीर झाला असून या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून दोन मुख्याध्यापकांचाही यात समावेश आहे मठ हायस्कूल चे मुख्याध्यापक सुनील जाधव व मोंड हायस्कूल मुख्याध्यापिका आसावरी कदम यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू बोर्डी येथे होणाऱ्या मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मोठया दिमाखात होणार आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्या सह शैक्षणिक,सामाजिक, राजकीय स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ओटवणे श्रीं रवळनाथ विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कै. मनोहर उर्फ काका दामले यांनी कष्टातून उभे केले. त्यांच्या आकस्मिक निधना नंतरही मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी आपल्या सहकारी शिक्षकवृंदाच्या, कर्मचाऱ्यांच्या आणि गावच्या सहकार्याने हे विद्येच मंदिर सांभाळले,त्यांनी हा डोलारा एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे समर्थ पणे सांभाळला.विद्या दानाबरोबर प्रसंगी शाळेला ज्या ज्या वेळी गरज लागली त्या त्या वेळी अनेक गोष्टी स्व खर्चातूनही वारंवार केल्यात.होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी नेहमी मदतीचा हात दिला.ओटवणे हायस्कूल च्या स्थापनेपासून म्हणजे १९९७-९८पासून आज २०२६ म्हणजे गेली ३० वर्षे मुख्याध्यापक पदाची जबादारी समर्थ पणे पेलली.सुरुवातीची कित्तेक वर्षे तर अल्पशा मानधनावर काढलीत पण याही परिस्थितीत त्यांनी धीर सोडला नाही आपल्या सहकाऱ्यांचही मनोबल खचू दिलं नाही. नेहमीच गुणवत्तेचा आलेख चढता ठेवताना शाळेला प्रगतीच्या दिशेने नेले.शाळेचा सुरुवातीचा विना अनुदानित असतानाच संघर्षाचा काळ राजेंद्र देसाई यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हाताळला.आज शाळा सर्वच पातळीवर प्रगती करत असताना त्यांनी शाळेसाठी केलेला त्याग दिलेलं योगदान, विद्यार्थी घडविण्यात घेतलेली मेहनत आणि अपार कष्ट प्रसंगी अनेक गोष्टींचा त्याग पाहता त्यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कामाची पोच पावती आणि या सर्व कामाची,अद्यापनात विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबविलेलं नावीन्यपूर्ण उपक्रम याची दखल म्हणजे महामंडळाकडून जाहीर झालेला गुणवंत राज्यस्तरीय मुख्याध्यापक पुरस्कार आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.