कोतवाल पदांच्या भरतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

▪️नाशिक व कोकण विभागाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या

​मसुरे | झुंजार पेडणेकर
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेली २९१२ महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्यासाठी महसूल व वन विभागाने एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे विभागातील पदभरती यापूर्वीच स्थगित करण्यात आली होती. तसेच, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित असलेल्या नाशिक आणि कोकण विभागातील महसूल सेवक पदाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
​सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्णयातील वयोमर्यादेची शिथिलता महसूल सेवक पदाकरिता लागू आहे किंवा कसे, याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. हे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर वयोमर्यादेबाबतचा निर्णय कळविण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने महसूल सेवक पदभरतीचे एक सर्वसमावेशक सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
​महसूल सेवक पदभरतीचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
​तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविणे: २३ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६,
​रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करणे: १ डिसेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६ ,
​परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना: १५ डिसेंबर २०२६,
​जाहिरातीचा कालावधी: १६ डिसेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६,
​अर्जाची छाननी: १ जानेवारी २०२७ ते ७ जानेवारी २०२७,
​प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे: ८ जानेवारी २०२७ ते १५ जानेवारी २०२७,
​लेखी परीक्षा: १७ जानेवारी २०२७,
​उत्तरसूची व निकाल घोषणा: १८ जानेवारी २०२७ ,
​दस्तऐवज पडताळणी: १८ जानेवारी २०२७ ते २५ जानेवारी २०२७,
​अिमम नियुक्तीपत्र निर्गमित करणे: २६ जानेवारी २०२७.
​नाशिक व कोकण विभागातील 15 नोव्हेंबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.