▪️जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत ग्रामपंचायत वडाचापाट येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम उत्साहात संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण, जिल्हा रायगड यांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेला जनजातीय गौरव दिवस या सेवा सप्ताह २०२६ च्या अनुषंगाने ग्रामपंचायत वडाचापाट येथे कातकरी वस्तीवर ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ व जनजातीय गौरव दिन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कातकरी वस्तीमध्ये स्वच्छता उपक्रम व नागरिकांचा बीपी (रक्तदाब) व शुगर (मधुमेह) तपासणी करण्यात आली. तसेच महिलांना आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.व वापरा बाबत माहिती देण्यात आली
या उपक्रमाला पंचायत समितीच्या सभापती सौ.प्रज्ञा चव्हाण , जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे, पंचायत समिती मालवणचे सहा. गटविकास अधिकारी श्री. पांडुरंग सावंत, नायब तहसीलदार महसूलचे श्री.विनायक जांभेकर, मंडळ अधिकारी श्री.संतोष गुरखे मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमातून ग्रामीण व आदिवासी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. गावातील प्रत्येक नागरिक निरोगी व आरोग्यसंपन्न राहावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत वडाचापाटच्या सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री.सचिन पाताडे, सदस्या सौ. माळकर, माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभूदेसाई, उद्योजक श्री. दयानंद प्रभूदेसाई, लोक प्रतिनिधी व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण धोंडी सरमळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेन (रायगड) येथील अधिकारी श्री. रोशन डिसोझा, आरोग्य विभागाच्या सीएचओ भक्ती परब, आरोग्य सेविका पेडणेकर, चव्हाण, आरोग सेवक कसालकर, श्री. मनीष सावंत, श्री. अमित प्रभूदेसाई, विनायक आंगणे श्री. चंद्रकांत वाघमारे, श्री. रत्नाकर पालव, आशा सेविका व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.
जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या आरोग्य, स्वच्छता व सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत वडाचापाटच्यावतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.













