नारुर येथे श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ रोजी

तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पालखी सोहळा, कीर्तन आणि दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

स्वप्निल कदम कुडाळ:
येथील श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक विधी, अभिषेक, सालंकृत महापूजा, महाआरती, महाप्रसाद, पालखी सोहळा, कीर्तन आणि दशावतार नाट्यप्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना, ६.३० वाजता लघुरुद्र, ८ वाजता उपदेवता पूजा, तर ९ वाजता श्री देवी महालक्ष्मीची सालंकृत महापूजा होणार आहे. यावेळी ओटी भरणे व नवस फेडणे सेवा सुरू होणार आहे. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, १ वाजता महाआरती आणि १.३० वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वाजता उपदेवतांना दीपदान, ७ वाजता त्रिपुरवाती पेटविणे, ७.३० वाजता पुराणवाचन व आरती, रात्री ११ वाजता पालखी सोहळा, तर मध्यरात्री १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता भाविकांकडून अभिषेक सेवा, ११ वाजता सालंकृत महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, ३ वाजता गोपाळकाला, सायंकाळी ५ वाजता देव स्नानासाठी देवतळी, ६ वाजता उपदेवतांना भेट आणि रात्री १० वाजता लळिताचे कीर्तन, अक्षतारूपी व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक व सालंकृत महापूजा, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, १ वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे. या दिवशीच्या महापूजेचे यजमानपद कोल्हापूर येथील श्री. प्रभाकर दत्तात्रय बिल्ले भूषविणार आहेत. सायंकाळी ४ वाजता सांगतेची प्रार्थना होऊन जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.