गोळप येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी साठे तृतीय

गौरव पोंक्षे माखजन: 
रत्नागिरी नजीक श्रीराम दरबार प्रतिष्ठान गोळप तर्फे आयोजित केलेल्या खुल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील,माखजन इंग्लिश स्कूल ला इयत्ता नववी ला शिकणाऱ्या कु.कल्याणी सचिन साठे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
श्री राम दरबार प्रतिष्ठान गोळप यांचे या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते.खुला गट असल्याने अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.अवघ्या नववी मध्ये शिकणाऱ्या कल्याणी साठे हिने उत्तम सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवला.खुल्या गटाची स्पर्धा असल्याने मी ना आस्तिक!,मला काय करायचं?,सुख पाहता जवापाडे,कोकणचे पाणी,जेन..झी. असे आवाहनात्मक विषय ठेवण्यात आले होते.कल्याणी ने ‘मला काय करायचंय?’ या विषयवार सादरीकरण केले.जिल्ह्यातून एकूण २४ स्पर्धक सहभागी झाले होते.
कु. कल्याणी ला तिचे वडील ह.भ.प.सचिन बुवा साठे यांचे मार्गदर्शन लाभले..कल्याणी च्या या यशाबद्दल माखजन पंचक्रोशी व प्रशालेतून कौतुक व अभिनंदन होत आहे.