कोदवली पर्ययी धरणाला दरवाजे बसविल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी केली धरणाची पहाणी

राजापर प्रतिनिधी: शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खाली बांधण्यात आलेल्या पर्यायी धरणाला दरवाजे बसविण्यात आल्याने कोदवली धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. सोमवारी नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी या धरणास्थळी जात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धरणावर दरवाजे बसविण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे आता टंचाई काळात राजापूरकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
आगामी काळात शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, तसेच शहरवासीयांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, या दृष्टीने धरणातील पाणीसाठ्याची पाहणी करण्यात आली. गत महिन्यातच या पर्यायी धरणाला दरवाजे बसविण्यात आले होते. जेणेकरून पाणीसाठयात वाढ होईल, त्याची परिणीती दिसून आली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत झालेली वाढ पाहता आगामी उन्हाळ्यात राजापूर शहराला आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करता येणार आहे. मात्र राजापूर शहरवासियांनीही पाणी बचतीची साथ आवश्यक आहे असेही नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी नमुद केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता रणवीर देसाई, स्वप्नील पड्यार तसेच कर निरीक्षक श्री. डांबरे उपस्थित होते.