रत्नागिरी:
दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:४० वाजण्याच्या सुमारास, रत्नागिरीतील कोकण नगर ते शिवरेवाडी जाणाऱ्या रोडवर अजिजा बिल्डिंगच्या बाजूला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली असून, आरोपी नायाब इरफान खलपे (वय २७, रा. किर्तीनगर मजगाव रोड, रत्नागिरी) आणि अरबाज अबरार फकीर (वय ३०, रा. उक्ताड फकीर मोहल्ला, चिपळूण) या दोघांनी बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने आपल्या ताब्यात ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ बाळगल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून ८०,००० रुपये किमतीचे एकूण ०७.५ ग्रॅम वजनाचे (प्लास्टिक पिशवीसह, निव्वळ वजन ४ ग्रॅम आणि एकूण १०० पुड्या) ब्राऊन हेरॉईन, अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेल्या रिकाम्या पिशव्या व पुड्या बांधण्याचे कागद, तसेच दोन मोबाईल संच आणि १,४०,००० रुपये किमतीची एक बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण २,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी रात्री २२:०५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना रात्री २२:३९ वाजता अटक करण्यात आली आहे.












