पुन्हा एकदा अधोरेखित असून आंबोली – चौकुळ मार्गावर स्थानिक तरुणांना पट्टेरी वाघाचे अद्भुत दर्शन घडले. त्या वाघाचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडीओ त्यांनी कॅमेराबद्ध केला असून सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री आंबोली – चौकुळ रोडवर चौकुळ दिशेला जाणाऱ्या काही तरुणांना मध्यरात्रीच्या सुमारास पट्टेरी वाघाचे (अंदाजे २ वर्ष वय) त्यांना अगदी जवळून दर्शन झाले. त्यावेळी तरुणांनी त्याला कॅमेराबद्ध केले. अन त्या वाघाचा रोमांचकारी व्हिडीओ हा सद्या सोशल मीडिया वर प्रचंड वायरल होत आहे. यावर महाउपवन संरक्षक मिलिश शर्मा (वनविभाग सावंतवाडी) यांनीही दुजोरा देत, हा बछडा मूळ दीड ते दोन वर्षाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर काही महिन्यांपूर्वी त्याच चौकुळ परिसरात मादी वाघाचे बछड्यां सहित अनेकदा दर्शन यापूर्वीही झाले होते. त्यामुळे सदर वाघाचा बछडा त्याच्या कळपा सोबत किंवा वेगळा झालेला असण्याची शक्यता आहे.
आंबोली, चौकुळ, गेळे व आजरा, चंदगड (जि. कोल्हापूर) सह दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) ह्या सह्याद्री पट्ट्यात पट्टेरी वाघांचे मोठे अस्तित्व आहे. तसेच त्यांचा सुरक्षित अधिवासही आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात या पट्टेरी वाघांचाचे वारंवार स्थानिकांना व पर्यटकांना होत आहे. तर काही महिन्यांपूर्वी वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सुमारे ८ पट्टेरी वाघांची नोंद झाली होती. यात प्रथमदर्शी पाच मादी तर तीन नरांचा समावेश आहे.
आंबोली वनपरीक्षेत्रात पर्यटकांसाठी नियोजनबद्ध निसर्ग तथा जंगल सफारीची अधिकृत सुरुवात वनविभागाने तात्काळ करावी, अशी मागणी पुन्हा एकदा आंबोली टुरिझम कडून करण्यात आलेली आहे. तर आंबोली वन’परिसरात पट्टेरी वाघ, बिबटे (अगदी ब्लॅक पँथर सुद्धा), रानगवे, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, रानमांजरे, रानकुत्रे, कोल्हे, ससे, पक्षी आदी अनेक प्रजातींचे वन्यजीव आढळून येतात. याचा थेट फायदा वन्यजीव पर्यटनाला होऊ शकतो. सोबत स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल.










