गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी प्रसारक मंडळाच्या ॲड पी.आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा खेड तालुक्यातील लवेल येथे असलेल्या घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथे नेण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेज चा परिसर आणि विविध शाखा पाहता याव्यात,अनुभवता याव्यात व अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर करण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा,या साठी ह्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी च्या प्राध्यापकांनी सिव्हिल, मॅकेनिकल,केमिकलं,ए.आय,आदी विविध शाखांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.शिवाय आभासी प्रयोगशाळेत देखील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके अनुभवता आली.यावेळी ड्रोन कसा तयार करतात?किती प्रकारचे ड्रोन असतात?व तो कसा काम करतो याविषयी माहिती देत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
यावेळी प्रा ओंकार वनारे,प्रा क्रांती गजमल,प्रा.खेमराज देऊळकर,प्रा.व्ही.बी.सावंत,प्रा अनिकेत जाधव यांनी मार्गदर्शन केले.या अभ्यास दौऱ्या दरम्यान विद्यार्थ्यांसमवेत प्रा गौरव पोंक्षे ,प्रा ऋषिकेश लोध,प्रा मालती गुरव आदी उपस्थित होते.तर या अभ्यास दौऱ्याला एस.आर जाधव,व संदीप फेफडे यांचे सहकार्य लाभले.













