मंत्री चंद्रकांत पाटील गुहागरात; व्याडेश्वर-दुर्गादेवीचे घेतले दर्शन

गुहागर प्रतिनिधी :
राज्याचे उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुहागर दौऱ्या दरम्यान श्री देव व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांचा देवस्थानतर्फे सन्मान करण्यात आला.
चंद्रकांत पाटील हे वाहनाने गुहागर येथे आले. येथे त्यांनी प्रथम श्री व्याडेश्वराचे, श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले.ना. पाटील हे गेले काही वर्षे आपल्या पत्नीसह गुहागर येथे देवदर्शन घेतात. दोन्ही ठिकाणी देवस्थानतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर भेटी दरम्यान गुहागर विविध समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली.
यावेळी त्यांच्या समवेत सचिन पटवर्धन, डॉ. विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, व्याडेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शार्दूल भावे, विश्वस्त अमरदीप परचुरे,श्री. मुसळे, शाम आठवले, दुर्गादेवी देवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, उमेश भोसले, परीक्षित पाटील, संतोष सांगळे, सुजित साटले, नगरसेविका भावे, सोमण, सचिन ओक, मंदार पालशेतकर, नरेश पवार, संगम मोरे आदी उपस्थित होते.