डॉ. अनुराधा कुलकर्णी यांच्या ‘भगवद्गीतेच्या गाभ्याम्यात’ ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा २०२६ चा ग्रंथ पुरस्कार

ठाणे :संदेश जिमन
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने सन २०२६ चा ग्रंथ पुरस्कार डॉ. अनुराधा कुलकर्णी यांच्या ‘भगवद्गीतेच्या गाभ्याम्यात’ या ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे डॉ. कुलकर्णी यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव झाला आहे.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने पुरस्काराचे स्वरूप पुरस्कारपत्र, ग्रंथभेट आणि धनादेश असे आहे. संस्थेच्या १३३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता एम. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे हा समारंभ होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे आणि कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांनी डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना पत्राद्वारे पुरस्काराची माहिती देऊन समारंभाचे निमंत्रण दिले आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. अनुराधा कुलकर्णी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.