संगमेश्वरमध्ये प्रथमच मोफत रेटिना तपासणी शिबिराचे आयोजन!

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची संगमेश्वरमध्ये उपस्थिती नागरिकांसाठी आरोग्यसेवेची सुवर्णसंधी
शिबिराचे ठिकाण – गणपती मंदिर सभागृह, संगमेश्वर बाजारपेठ
तारीख – 24 नोव्हेंबर 2026
वेळ – स 10:00 ते दु 4:00

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या गंभीर आजारांबाबत जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने संगमेश्वरमध्ये प्रथमच डायबेटिस व रेटिना तपासणी शिबिराचे आयोजन इन्फिगो आय केअर हॉस्पीटलतर्फे करण्यात येत आहे.

या शिबिरासाठी सुपर स्पेशालिस्ट नेत्ररोगतज्ज्ञ व रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता आपल्या परिसरातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मधुमेहाचा परिणाम केवळ शरीरावरच नव्हे, तर डोळ्यांवरही होऊ शकतो. मधुमेहामुळे रेटिनावर परिणाम होऊन दृष्टी कमी होणे किंवा गंभीर परिस्थितीत दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी व योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, डोळ्यांची तपासणी, रेटिना तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, तपासणीदरम्यान एखाद्या रुग्णाला रेटिनासंबंधित पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यास, पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत नियमानुसार उपचार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुले आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही नागरिकाने उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि डोळ्यांच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

पूर्वनोंदणीसाठी संपर्क – 9372766504