संदीप मेस्त्री : कलमठमध्ये विकासकामांचा लोकप्रतिनिधींच्या हस्ते शुभारंभ
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीला १२ वर्षे पूर्ण होत आहे. या कालावधीत मंत्री नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावले आहेत. मतदारसंघातील विकासकामांना कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कलमठ गावाच्या विकासासाठी मंत्री राणेंनी विकासनिधी दिल्याने गावाचा सर्वांगीण विकास होत आहे, असे प्रतिपादन कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले.
पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण होत असल्याने कलमठमधील विविध भागात विकासकामांचा शुभारंभ लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ सोमवार २३ नोव्हेंबरला करण्यात आला. याप्रसंगी श्री. मेस्त्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच रवींद्र यादव, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, माजी उपसरपंच तथा सदस्य स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर, ग्रा. पं. सदस्य श्रेयस चिंदरकर, इफत शेख, नजराणा शेख, नितीन पवार, अनुप वारंग, अशोक कदम, किशोर कदम, शकील शेख, स्वाती नारकर, सुनील कदम, गंगाधर कदम, शैलेश कदम, महेंद्र कदम, सागर कदम, मिलिंद चिंदरकर, रमेश कदम, नंदकुमार कासले, शानू शाह प्रशांत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. मेस्त्री म्हणाले, १२ वर्षे मंत्री नितेश राणे यांनी आमदार म्हणून कणकवली मतदारसंघाला न्याय दिला आहे. कलमठ गावावर त्यांचे विशेष प्रेम असल्याने त्यांनी विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून दिल्याने गावाच्या विकासाला खºया अर्थाने चालना मिळाली आहे. मंत्री म्हणून राणेंनी २ वर्षांत केलेले काम कौतुकास्पद आहे. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्री राणे हे मेहनत असून त्यांच्या मेहनतीला नेहमी यश मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक किशोर कदम यांनी केले. मान्यवरांचे स्वागत गंगाधर कदम, अशोक कदम यांनी केले. दरम्यान, कलमठ कुंभारवाडी, वृंदावन कॉलोनी, कलमठ बौद्धवाडी याठिकाणी रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.













