सार्वजनिक उपक्रम समितीकडून पोफळी कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी

आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार निलेश राणे यांच्यासह समिती सदस्यांचा सहभाग

चिपळूण | संतोष सावर्डेकर
चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) कोयना जलविद्युत प्रकल्पाची सार्वजनिक उपक्रम समितीच्या वतीने पाहणी करण्यात आली. सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला. यावेळी कोकणचे लोकप्रिय नेतृत्व तथा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेतली.

या दौऱ्यादरम्यान महानिर्मितीच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा, कामकाजाचा तसेच प्रकल्पाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

प्रकल्पाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने सुरू असलेले काम, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्राच्या वीज निर्मिती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात या प्रकल्पाचे मोठे योगदान असून, या प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सार्वजनिक उपक्रम समितीचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख आमदार राहुल कुल, आमदार निलेश राणे यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.