एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या!

आरोग्यदायी खाद्यसंस्कृती, स्वच्छता आणि दर्जेदार आदरातिथ्यामुळे हॉटेल नीलम नक्षत्र ठरतेय आकर्षणाचे केंद्र

स्वप्निल कदम-कुडाळ :        पर्यटन, व्यवसाय आणि कौटुंबिक प्रवासासाठी कुडाळमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना निवासासह उत्तम खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणारे हॉटेल नीलम नक्षत्र सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. एकाच इमारतीत २७ आलिशान खोल्या आणि सहा स्वतंत्र फूड आउटलेट्स अशी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा येथे उपलब्ध आहे. आधुनिक सजावट, आल्हाददायक वातावरण आणि दर्जेदार आदरातिथ्य ही या हॉटेलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

 

हॉटेलमध्ये डिलक्स, स्वीट आणि फॅमिली रूमचे पर्याय उपलब्ध असून, Jusjaas, QuadrO, Rohini, Kaffa, Thali De Tall आणि Pablo Escobar या सहा फूड आउटलेट्सच्या माध्यमातून विविध खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येतो. प्रत्येक आउटलेटची स्वतंत्र खाद्यसंकल्पना आणि वातावरण असल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या चवींचा आनंद घेण्याची संधी मिळते.

 

या हॉटेलचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसोबतच आरोग्य आणि स्वच्छतेला दिलेले प्राधान्य. येथे खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम खाद्यरंगांचा वापर केला जात नाही. रिफाइंड तेलाऐवजी पारंपरिक घाण्याच्या तेलाचा वापर केला जातो. सेंद्रिय भाजीपाला, ताजी फळे आणि नैसर्गिक मसाल्यांच्या वापरावर भर दिला जातो. लहान मुलांच्या आवडी, सुरक्षितता आणि आरोग्याचा विचार करून चाइल्ड सेंट्रिक हॉटेल ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे.

 

ग्राहकांना हॉटेलच्या स्वयंपाकघराची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, यासाठी किचन टूरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि पारदर्शकतेचा अनुभव ग्राहकांना घेता येतो. याशिवाय अल्कलाइन वॉटरची सुविधा देण्यात आली असून, हॉटेलची कार्यप्रणाली एफडीएच्या निर्धारित मानकांनुसार आणि ISO प्रमाणित आहे.

 

सेवेचा दर्जा कायम राखण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नियमित ब्रिफिंग, मीटिंग आणि प्रशिक्षण घेतले जाते. स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, ग्राहकांचे समाधान आणि आपुलकीचे आदरातिथ्य यावर व्यवस्थापनाकडून विशेष लक्ष दिले जाते.

 

केवळ चविष्ट खाद्यपदार्थ देण्यापुरते मर्यादित न राहता आरोग्य, स्वच्छता, गुणवत्ता, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास यांना सर्वोच्च प्राधान्य देत हॉटेल नीलम नक्षत्रने कुडाळच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.या प्रसंगी स्नेहा बाम्बुळकर (फ्रंट ऑफिस व्यवस्थापक), माँटी पनवार (खाद्य व पेय विभाग व्यवस्थापक), सचिन बालदवा (सल्लागार) आणि गौरव मुंज आदी मान्यवर उपस्थित होते.