विश्वविक्रम! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने केल्या ५३ चेंडूत २०४ धावा

तब्बल २८ षटकार व ७ चौकारांचा धमाका

जेक फ्रेझर-मॅकगर्कचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

मुंबई : वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आशिया कप रायजिंग स्टार्स मधील सामन्यात युएईविरुद्ध त्यानं अवघ्या ५३ चेंडूंमध्ये २८ षटकार आणि ७ चौकारांसह २०४ धावा ठोकल्या.

वैभवनं २८ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. चाहते त्याच्या या कामगिरीचा आनंद साजरा करत असतानाच, त्यानं अवघ्या ५२ चेंडूंमध्ये आपलं द्विशतक पूर्ण केलं.

त्याच्या खेळीमुळे इंडिया ‘ए’ संघानं अवघ्या १४ .२ षटकांत २५० धावांचं लक्ष्य गाठलं.
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २८ चेंडूत शतक झळकावून ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत अ आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या २८ चेंडूत शतक झळकावून ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या या युवा खेळाडूची ही एक उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

पाकिस्तान शाहीनविरुद्धचा सामना गमावल्यानंतर तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा ‘करो या मरो’चा सामना होता. २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. वैभवच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ५ षटकांतच १०० धावांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

वैभवने पहिल्या पॉवरप्लेमध्येच यूएईच्या सर्व गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने आपल्या शतकी खेळीत तब्बल १४ षटकार खेचले. यापूर्वी ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या (२९ चेंडू) नावावर होता, जो आता वैभवने मोडला आहे. भारताने घडवलेल्या या अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटूची ही एक अविश्वसनीय खेळी ठरली आहे.

शतक झळकावल्यानंतरही वैभवची आक्रमक फलंदाजी सुरूच असून त्याने १५० धावांचा टप्पा पार केला आहे. तो आता यूएईच्या गोलंदाजांचा समाचार घेत एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा अविश्वसनीय विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील सर्वात जलद शतकांच्या यादीत आता वैभव (२८ चेंडू, यूएईविरुद्ध) अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जेक फ्रेझर-मॅकगर्क (२९ चेंडू, टास्मानियाविरुद्ध), एबी डिव्हिलियर्स (३१ चेंडू, वेस्ट इंडिजविरुद्ध), साकिबुल गनी (३२ चेंडू, अरुणाचल प्रदेशविरुद्ध), इशान किशन (३३ चेंडू, कर्नाटकविरुद्ध), अनमोलप्रीत सिंग (३५ चेंडू, अरुणाचल प्रदेशविरुद्ध), कोरी अँडरसन (३६ चेंडू, वेस्ट इंडिजविरुद्ध), ग्रॅहम रोझ (३६ चेंडू, डेव्हॉनविरुद्ध) आणि स्वतः वैभव सूर्यवंशी (३६ चेंडू, अरुणाचल प्रदेशविरुद्ध) यांचा क्रमांक लागतो.

व्यावसायिक क्रिकेटमध्ये वैभवने यापूर्वीही अशी अनेक जलद शतके झळकावली आहेत. त्याने २०२६ मध्ये दोहा येथे यूएईविरुद्ध (२८ चेंडू, लिस्ट ए), २०२५ मध्ये दोहा येथेच यूएईविरुद्ध (३२ चेंडू, टी-२०), २०२५ मध्ये जयपूर येथे आरआर विरुद्ध जीटी सामन्यात (३५ चेंडू, टी-२०), २०२५ मध्ये रांची येथे बिहार विरुद्ध अरुणाचल सामन्यात (३६ चेंडू, लिस्ट ए), २०२६ मध्ये जयपूर येथे आरआर विरुद्ध एसआरएच सामन्यात (३६ चेंडू, टी-२०) आणि २०२५ मध्ये कोलकाता येथे बिहार विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात (५८ चेंडू, टी-२०) शतके पूर्ण केली आहेत.