थंडीचा जोर ओसरला : रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता

​सिंधुदुर्गात चार दिवस ढगाळ वातावरण

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरणात पुढील चार दिवस लक्षणीय बदल होणार असून, २४ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात दिवसा ढगाळ वातावरण राहील, तर रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात रात्रीचे तापमान २३ अंश सेल्सिअस ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

​जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या भागांत प्रामुख्याने या हवामान बदलाचा प्रभाव जाणवणार आहे. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे दिवसा आकाश ढगांनी व्यापलेले राहील आणि रात्रीच्या उकाड्यात काहीशी वाढ होईल. हवामानातील या बदलाबाबतची सविस्तर माहिती जिल्हा परिषद केंद्र शाळा कळसुली-दिंडवणे येथील पदवीधर शिक्षक श्री. रवींद्र भीमराव मोरे यांनी दिली आहे.

​वातावरणातील या बदलांमुळे आंबा व काजू बागायतदारांसह सामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्याची आणि पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.