चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण नगरपरिषद नियोजन व शिक्षण समितीच्या माध्यमातून इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधी आणि अभ्यास नियोजन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, येथे हे शिबिर होणार असून, तज्ञ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरचा शुभारंभ नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी १०.३० वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी, करिअर निवड करणे, अभ्यासाचे योग्य नियोजन करणे, याबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ ते ३ वाजेपर्यंत, २८ नोव्हेंबर रोजी इयत्ता १२ विद्यार्थ्यांसाठी ११ ते ३ वाजेपर्यंत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर विषयक वाटचालीला दिशा देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.












