रत्नागिरी : कोकणा विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्व म्हात्रे यांच्या प्रयत्नाने राज्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित डी.एल.एड कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांसंबंधी राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे ,तसेच परिक्षा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती ओक यांच्या बरोबर शिक्षक प्रशिक्षक सेवाभावी संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने निवेदन दिले. तसेच चर्चा ,विचार विनिमय केला.
संघटनेचे राज्य सह.सचिव प्रा.सुनिल जोपळे यांनी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रशांत म्हसके यांच्या मार्गदर्शनानुसार टिमचे नेतृत्व पुण्यातील पाच प्राचार्याच्या साथीने केले .अत्यंत चांगल्या पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक चर्चा झाली.व प्राचार्य जगताप पी.व्ही. ज्ञानगंगा .डी.एल.एड.कॉलेज पुणे , प्राचार्य हिरामण लंघे, हरिश्चंद्र रायचंद्र बाफना डी.एल.एड.कॉलेज मावळ पुणे ,पाचार्या सविता रानडे , पार्वतीबाई डी.एल.एड.कॉलेज पुणे , प्राचार्या वीणा खांदोडे , भास्करराव कर्वे डी.एल.एड कॉलेज पुणे,प्राचार्या मृणालिनी साळवे, एथेल गार्डन डी.एड.कॉलेज पुणे. यावेळी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाले तरी डी.एड कॉलेज बंद होणार नाही . व् विद्यार्थी संख्येअभावी बंद झाली तर अशा प्राध्यापकांचे समायोज योग्य पध्दतीने केले जाईल . त्यामुळे भिती बाळगण्याची गरज नाही . असे यावेळी प्रा.सुनिल जोपळेयांनी स्पष्ट केले.










