.ओटवणे (प्रतिनिधी ) यावर्षी सरासरी पेक्षा कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणामुळे पुढील काही महिन्यात दुष्काळाचा सामना करावा लागणार असून या संकटावर मात करण्यासाठी सध्या कमी होत असलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ठीक ठिकाणी बंधारे घालून पाण्याची पातळी उंचावण्यासाठी बंधारे घालणे काळाची गरज असून याचाच भाग म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार ठीक ठिकाणी बंधारे घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाहून जाणारे पाणी ठीक ठिकाणी अडवून ते जमिनीत जिरवणे जेणेकरून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठीच ठीकठिकाणी बंदाऱ्यासाठी पाहणी सुरु असून ओटवणे नदीवर कच्या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी च्या प्रस्तावित जागेची पाहणी काल उशिरा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत केली. यावेळी तहसीलदार साहेब,अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळ ओरस श्री पाटील साहेब, कार्यकर्ते कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प विभाग सावंतवाडी श्री पाटील साहेब व अन्य जलसंपदा अधिकारी या क्षेत्रीय भेटीसाठी उपस्थित होते. लोकसहभागातून किंवा स्वयंसेवी संस्था, यांच्यावतीने सदर बंधारे करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.













