लांजा (प्रतिनिधी ) : लांजा तालुका भाजपाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
लांजा शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय या ठिकाणी हा संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र राणे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कांबळे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इकबाल गिरकर, भाजपा लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, माजी तालुका अध्यक्ष विजय कुरूप माजी शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप शेखर सावंत, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी बबन कांबळे, शशिकांत जाधव, मनोहर कांबळे, राजेंद्र कांबळे, दिनेश कोटकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजली कांबळे, दक्षिण मंडळ सरचिटणीस सुनील गुरव आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते













