सावंतवाडी : माजगाव हरसावंतवाडा येथील रहिवासी व माजी जिल्हा बँक संचालक कै. विकासभाई सावंत यांचे ज्येष्ठ बंधू वसंत गजानन तथा अण्णा सावंत ( ६८ ) यांचे आज शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, पुतण्या असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे ते काका होतं. रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.













