पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल येथे अनोखे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा संपन्न ..

मंडणगड l प्रतिनिधी : पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा संपन्न झाली. शाळेच्या मुलींनी शाळेत असलेल्या नारळाच्या झाडाचे औषण करून झाडाला टिळा लावून पूजन केले व राखी बांधून झाडाचे रक्षण करण्याचा दृढ संकल्प केला.तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाचा मौलिक संदेश समाजाला दिला. त्यांच्या या कृतीचे समाजात कौतुक होत आहे.

त्या नंतर प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी समोर असणाऱ्या खाडी प्रवाहात पुष्प अर्पण करून दर्या राजाचे पूजन केले.त्या नंतर शाळेत सर्व मुलींनी मुलांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

या वेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.गवारी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री सूर्यवंशी सर, वाकचौरे सर, विभाग प्रमुख श्री. इंगळे सर, लिपिक श्री पालकर भाऊ, शिपाई हिलम भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.

अशा प्रकारे अतिशय उत्साहात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन शाळेत पार पडले.