गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला.तर सदस्य म्हणून प्रसन्न पाटील,मंगेश कोंडविलकर, वैभवी जानवळकर,विभावरी लांजेकर निवडून आले असून नव्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपला पदभार शुक्रवारी स्वीकारला. यावेळी माजी सरपंच नम्रता संसारे,माजी उपसरपंच किशोर कुलकर्णी, माजी सदस्य अंतिम संसारे, जानवळे वि. वि.कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल देवस्थळी, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश नर्बेकर,प्रतिष्ठित नागरिक अनंत जाधव,राजेंद्र बेलवलकर, इसाक ठाकूर,मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर,मुख्याध्यापक रवींद्र इंदुलकर, गावकर मंगेश शितप,भरत विखारे,महेश तांबे,योगेश तांबे,गणेश तांबे,रमेश तांबे,सुरेश तांबे,प्रकाश पाटील,अनिल पाटील,महेश जाधव,अशोक कदम,प्रमोद वेद्रे,शैलेश आग्रे,सचिन कोळंबेकर,रविंद्र कोळंबेकर,विजय शिंदे,विनय बैकर,प्रसन्न कोळंबेकर,संदीप कोंडविलकर, अनिल कोंडविलकर, विजय कोंडविलकर,खालिदभाई,संजोग रावणंग,प्रवीण कानसे,साहिल जांभळे,रमेश जांभळे,प्रशांत शिरगावकर,प्रमोद शिरगावकर, धनंजय विखारे,प्रकाश भगवे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.












