माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन परिसरात विविध गावात गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे.गणेश मूर्ती कारखानाने गजबजलेले पहायला मिळत आहेत.अनेक ठिकाणी गणेश मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले पाहायला मिळत आहे.विविध आकर्षक मूर्ती सर्वत्र तयार झाल्याने.ग्राहकांची सुद्धा पसंदी साठी कारखान्यात रिघ लागत आहे.
ढोलकी,नाळ, तबला भरण्याच्या दुकानात कामाला वेग आला आहे.गणेश उत्सव अगदी जवळ येऊन ठेपल्याने या कारागीरांची देखील सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे.











