मंडणगड | प्रतिनिधी : पणदेरी पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.इंगळे सर यांनी केले. सुरुवातीला प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सुरुवातीला प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.सुर्यवंशी सर यांनी सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या .त्या नंतर प्रभारी मुख्याध्यापक श्री. गवारी सर यांनी हिंदी दिवसाचे व हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दीले.प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री इंगळे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी शिपाई हीलम भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारे अतिशय उत्साहात राष्ट्रीय हिंदी दिन प्रशालेत साजरा करण्यात आला.












